‘पुण्यदशम्’ सुसाट...

Published on

कात्रज, ता. १५ : ‘पीएमपीएमएल’ने पुणेकरांसाठी दहा रुपयांत दिवसभर प्रवासाची योजना आणली, तिला ‘पुण्यदशम्’ असे नाव दिले आहे. या बसमधून प्रवासासाठी ओळखपत्र सक्तीचे केले होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. कारण प्रत्येकवेळी प्रवाशांकडे ओळखपत्र असतेच असे नाही, याचा विचार करत पीएमपीएमएल प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी ओळखपत्र सक्तीचा निर्णय मागे घेतला. यामुळे ‘पुण्यदशम्’ला फायदा झाला असून, सुमारे २५ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे. शिवाय, प्रवासी संख्याही वाढली आहे.

उत्पन्नातील ठळक बाबी...
- सरासरी मासिक उत्पन्न ३२ लाखांपर्यंत
- ७ सप्टेंबरला ओळखपत्राची सक्ती हटविली
- त्यानंतर पुढील दोन महिन्यांत ४४ लाखांपर्यंत उत्पन्न

बसचे वैशिष्ट्ये...
- एकूण नऊ मार्गांवर ५० बस धावतात
- दिवसाला सरासरी ३४ हजार प्रवासी प्रवास करतात
- दिवसाला एक हजारापर्यंत बसच्या फेऱ्या
- मार्ग क्र. दोनवर (स्वारगेट-शिवाजीनगर) सर्वाधिक बस, निम्म्याहून अधिक उत्पन्न याच मार्गावर
- मार्ग क्र. दोनवर एकूण २० बस धावतात
- नऊ मार्गांवरील एका दिवसाचे उत्पन्न १,७०,००० त्यापैकी ८५,००० रुपये मार्ग क्र. दोनवरून मिळते

ओळखपत्राची अट असताना...
महिने-उत्पन्न (रु)
७ ऑगस्ट ते ७ ऑक्टोंबर- ६४,४६९८०

ओळखपत्राची अट शिथिल केल्यानंतर...
महिने-उत्पन्न (रु)
७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर-८७,१४,१७०

या मार्गावर आहे बससेवा...
१) पुणे स्टेशन ते शिवाजीनगर नवीन एसटी स्टँड
२) स्वारगेट ते शिवाजीनगर (वर्तुळ)
३) स्वारगेट ते पुणे स्टेशन (वर्तुळ)
४) स्वारगेट ते डेक्कन मार्गे शिवाजीनगर
५) स्वारगेट ते रामोशी गेटमार्गे पुणे स्टेशन
६) स्वारगेट ते सोन्या मारुती मार्गे पुणे स्टेशन
७) पुलगेट ते डेक्कन
८) डेक्कन ते नारायणपेठ मार्गे पुणे स्टेशन
९) डेक्कन ते वेस्टएंड मार्गे पुणे स्टेशन

‘‘पूर्वी केवळ स्वारगेटवरून शिवाजीनगरला किंवा पुणे स्टेशनला जाण्यासाठी दहा रुपये तिकीटदर आकारला जात होता. आता दहा रुपयांत जाऊन येता येत होते. शिवाय दहा रुपयांत दिवसभर प्रवास करता येतो. तसेच, उपनगरांतून येणाऱ्या मोठ्या बस थेट पेठांमध्ये जात नसल्याने वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होत आहे. त्याचबरोबर, अल्पदरात प्रवास करता येत असल्याने प्रवाशांना आनंद आहे. प्रवासी हळूहळू या नवीन व्यवस्थेशी जुळवून घेत आहेत.’’
- राजेश कुदळे, आगारप्रमुख, स्वारगेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com