चौरस आहाराबाबत विशेष
 चर्चासत्राचे आयोजन

चौरस आहाराबाबत विशेष चर्चासत्राचे आयोजन

Published on

पुणे, ता. २० : सुदृढ आरोग्यासाठी चौरस आहाराचे महत्त्व लक्षात घेऊन चर्चासत्राचे आयोजन ‘आल्मन्ड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया’तर्फे करण्यात आले होते. अभिनेत्री ऊर्मिला कोठारे, आहारतज्ज्ञ नेहा रंगलानी यांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला. बदललेल्या जीवनशैलीवर पुनर्विचार करण्याची गरज यावेळी रंगलानी यांनी अधोरेखित केली. आहाराच्या सवयी अंगी लावण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. लठ्ठपणा, मधुमेह, हृदयाच्या समस्या अशा अनेक तक्रारी आहार आणि व्यायामाच्या काही सवयी बदलल्याने दूर होऊ शकतात. त्यासाठी रोजच्या आहारामध्ये ‘ब’ जीवनसत्त्व, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस यांचा उत्तम स्रोत असलेले बदाम आणि सुक्यामेव्याचे सेवन करणे उपयुक्त ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com