व्यसनमुक्ती उपचार परिषदेचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यसनमुक्ती उपचार परिषदेचे आयोजन
व्यसनमुक्ती उपचार परिषदेचे आयोजन

व्यसनमुक्ती उपचार परिषदेचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः मुक्ता चॅरिटेबल फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ पुणे, कात्रज यांच्यातर्फे ‘व्यसनमुक्ती उपचार’ या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली आहे. येत्या शनिवार (ता. २६) आणि रविवारी (ता. २७) सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत ही परिषद बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या एम. जी. सभागृहात होणार आहे. मुक्ता संस्थेतर्फे व्यसनमुक्ती उपचार विषयावर आयोजित केलेली ही चोविसावी परिषद आहे. यामध्ये मानसोपचार तज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ तसेच समुपदेशक हे मार्गदर्शन करणार आहे. या विषयाबद्दल सखोल आणि अद्ययावत माहिती घेण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, समुपदेशक, व्यसनमुक्तीसाठी काम करणारे इच्छुक, समाजसेवक, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी व मानसोपचार तज्ज्ञ सहभागी होऊ शकतात, असे आयोजक डॉ. प्रकाश महाजन यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top