अपहृत तरुणाची चार तासात सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहृत तरुणाची चार तासात सुटका
अपहृत तरुणाची चार तासात सुटका

अपहृत तरुणाची चार तासात सुटका

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : हातऊसने घेतलेले पैसे वेळेत न दिल्याच्या कारणावरून नोकरदार तरुणाचे टोळक्‍याने अपहरण केले. या घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांच्या युनिट पाचच्या पथकाने अवघ्या चार तासातच त्याची सुटका केली व अपहरण करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. ही घटना रविवारी सकाळी हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात घडली होती.

दीपक मोहन ताकतोड (वय ३२), छगन विठ्ठल जगदाळे (वय ३३), भगवान दत्तू शिंदे (वय ४८), विशाल नानासाहेब सावंत (वय ३५), विजय सिद्धेश्वर शितोळे (वय २७, सर्व रा. अरण, माढा, सोलापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अतिक तांबोळी (वय ३०) असे अपहरण केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तांबोळी याचा साडू सादीक सलीम शेख (वय ३२, रा. हडपसर) याने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून हडपसर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिक हा काही वर्षांपूर्वी सोलापूरमध्ये राहात होता. त्याने तेथील छगन जगदाळे याच्याकडून २० हजार रुपये घेतले होते. त्यातील १५ हजार रुपये त्याने परत केले होते. तरीही जगदाळे अतितकडे एक लाख रुपयांची मागणी करीत होता. दरम्यान, अतिक पुण्यात आला. रविवारी सकाळी अतिक व फिर्यादी हे दोघेजण एका लग्नासाठी जात होते. शेवाळवाडी पेट्रोल पंपावर ते गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी गेले. त्यावेळी कारमधून आलेल्या व्यक्तींनी अतिक यास जबरदस्तीने कारमध्ये बसवून त्याचे अपहरण केले. हा प्रकार फिर्यादीने पाहिला. त्यानंतर त्यांनी याबाबत तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. दरम्यान, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे व त्यांचे सहकारी घटनास्थळी पोचले. आरोपींना शोधून अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top