रेल्वे प्रवासात धुम्रपान करणाऱ्या १६० जणांवर कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वे प्रवासात धुम्रपान करणाऱ्या  १६० जणांवर कारवाई
रेल्वे प्रवासात धुम्रपान करणाऱ्या १६० जणांवर कारवाई

रेल्वे प्रवासात धुम्रपान करणाऱ्या १६० जणांवर कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २६ ः मध्य रेल्वे प्रवाशांना सुरक्षित आणि उत्तम प्रवास सेवा देण्याचा प्रयत्न करते. रेल्वे प्रवासादरम्यान धूम्रपान करण्यास मनाई आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर विभागात धूम्रपान विरोधी सुरक्षा मोहीम सुरू केली असून दोन दिवसात १६० व्यक्तींवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून २९ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, असे मध्य रेल्वेने सांगितले. प्रवाशांनी रेल्वे आवारात आणि गाड्यांमध्ये धूम्रपान न करता स्वतःसह इतर प्रवाशांसाठी सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top