‘दृक् चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘दृक् चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन
‘दृक् चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन

‘दृक् चिंतन’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः प्रख्यात चित्रकार प्रभाकर कोलते यांनी विविध भारतीय व पाश्चात्त्य चित्रकारांवर लिहिलेल्या लेखांच्या ‘दृक् चिंतन’ या पुस्तकाचे अनुनाद प्रकाशनातर्फे नुकतेच प्रकाशन झाले. ‘बुलडाणा अर्बन’चे अध्यक्ष शिरीष देशपांडे आणि ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’चे अजित गाडगीळ यांच्या उपस्थितीत पुस्तक विकत घेतलेल्या पाच वाचकांच्या हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे आयोजित हा सोहळा टिळक रस्त्यावरील रंगदर्शन सभागृहात पार पडला. या प्रसंगी अरुणा ढेरे, रंगनाथ पठारे, नचिकेत पटवर्धन, चंद्रमोहन कुलकर्णी, जयंत जोशी आदी उपस्थित होते. प्रभाकर कोलते यांचे चित्रकलेवरील चिंतनात्मक विचार, भारतीय तसेच पाश्चात्त्य चित्रकारांवरील अभ्यासपूर्ण लेख आणि त्यांचे चित्रनिर्मितीबाबतचे सर्जन अनुभव या पुस्तकात आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top