‘केमो’च्या दुष्परिणामावर आयुर्वेदिक मात्रा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘केमो’च्या दुष्परिणामावर
आयुर्वेदिक मात्रा!
‘केमो’च्या दुष्परिणामावर आयुर्वेदिक मात्रा!

‘केमो’च्या दुष्परिणामावर आयुर्वेदिक मात्रा!

sakal_logo
By

पुणे, ता. १ : कर्करोग उपचारातील केमोथेरपीसारख्या प्रचंड वेदानादायक उपचारांचा दाह कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांची मात्रा उपयुक्त ठरत असल्याचे निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. भारतीय संस्कृती दर्शन ट्रस्टतर्फे चालविण्यात येणाऱ्या ‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’तर्फे हे संशोधन करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.

कसा केला अभ्यास?
स्तनाचा कर्करोग झालेल्या ५५८ रुग्णांचा या संशोधन प्रकल्पांतर्गत अभ्यास करण्यात आला. त्यात रुग्णाचे आहार-विहाराची बारकाईने माहिती घेतली. त्याच्या विश्लेषणातून असे स्पष्ट होते की, अतिशय गोड, चमचमीत, तिखट, शरिरात स्त्राव निर्माण करणारे दह्यासारखे पदार्थ, शिले, आंबविलेले पदार्थ, मांसाहार, बेकरी उत्पादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना या आजाराचा धोका जास्त आहे. तसेच, मानसिक ताणतणाव, रजोनिवृत्ती आणि अनुवंशिकता ही स्तनाच्या कार्करोगाची संभाव्य कारणे असल्याचे या अभ्यासातून अधोरेखित झाले आहे.

आयुर्वेदिक औषधांची मात्रा
‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’ स्तनाच्या कर्करोगासाठी उपचार घेणाऱ्या दोन हजार २३४ रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. त्यापैकी ७१२ रुग्णांनी केमोथेरपीबरोबरच दीर्घकालीन आयुर्वेद चिकित्सा घेतली. त्यातील २०२ रुग्णांनी पहिल्या केमोथेरपीपासून आयुर्वेदिक उपचारांना सुरवात केली. अशा रुग्णांमध्ये केमोथेरपी सुरू असताना किंवा ती संपल्यांवरही त्याचा होणार त्रास फारसा जाणवला नाही. या रुग्णांना आयुर्वेदिक औषधांमुळे फायदा झाला. केमोथेरपीचे दुष्परिणाम चांगल्याप्रकारे सुसह्य झाले.

‘इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर’चे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख म्हणाले, ‘‘स्तनाच्या कर्करोगाच्या रुग्णांना व्याधिक्षमत्व वाढविणारी सुवर्णभस्मदि योग ही रसायन चिकित्सा उपयुक्त ठरत असल्याने अभ्यासातून दिसते. चार ते सहा वर्षे रसायन चिकित्सा घेतलेल्या रुग्णांचे आयुर्मान पाच ते दहा वर्षे आढळले आहे. पंचकर्म हे देखील अशा रुग्णांमध्ये प्रभावी ठरते. त्यातून नियमित पंचकर्म घेणाऱ्या रुग्णांची जीवनाची गुवणत्ता चांगली राहाते.’’

असा केला अभ्यास
ट्रीपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या अतिशय घातक व तीन वर्षांच्या आतच पुन्हा उद्भवणाऱ्या स्तनाच्या कर्करुग्णांमध्ये अभ्यास करण्यात आला. २७ रुग्णांच्या एका गटाला तीन वर्षे आयुर्वेदिक औषधे दिली. तसेच, २६ रुग्णांच्या दुसऱ्या गटास आयुर्वेदीक औषधे दिली नाहीत. त्यामध्ये आयुर्वेदिक औषधे दिलेल्या पहिल्या गटातील बहुतांश रुग्णांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, असेही संस्थेतर्फे स्पष्ट केले.

ब्रॅका १ व ब्रॅका २ ही अनुवंशिकता असलेल्या नऊ रुग्णांना तीन वर्षे पंचकर्मासह आयुर्वेदिक चिकित्सा दिली. त्यापैकी आठ रुग्ण गेली पाच रुग्ण कर्करोगमुक्त जीवन जगत आहेत. अशा प्रकारची अनुवंशिकता असलेल्या कर्करुग्णांमध्ये दुसऱ्या स्तनात किंवा स्त्रीबीजांडामध्ये कर्करोग पसरण्याचा धोका असतो.
डॉ. सदानंद सरदेशमुख, संचालक, इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँण्ड रिसर्च सेंटर

स्तनाच्या कर्करोगापैकी फक्त एक टक्का पुरुषांमध्ये होतो. त्यामुळे स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये सामान्यतः आढळत असला तरीही पुरुषांमध्ये तो दुर्मिळ असतो. मला२०१० मध्ये याचे निदान झाले. त्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर लगेच आयुर्वेदिक उपचार सुरू केले. आता बारा वर्षे झाले कर्करोगमुक्त जीवन जगत आहे.
- एक रुग्ण