आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम राबवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम राबवा
आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम राबवा

आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम राबवा

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी केवळ शाळा हा एकमेव पर्याय उपलब्ध असून, त्यांना शाळे व्यतिरिक्त खासगी शिकवणी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.+ त्यासाठी शिक्षकांनी शाळेतील उपलब्ध भौतिक साधनांचा शालेय इमारत, वर्गखोल्या व संगणक कक्ष यांचा शाळा सुटल्यानंतर योग्य वापर करून , आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्टित व व्यावसायिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत २०२० मधील ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी अंतिम दहा शिक्षकांमध्ये निवड झालेले दक्षिण कोरियातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रस्नेही शिक्षक व मार्गदर्शक जेओंग हियुन युन यांनी ऑनलाइन मार्गदर्शनावेळी व्यक्त केले.
सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूज पेपर इन एज्युकेशन), सकाळ इंडिया फाउंडेशन व पुण्यातील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी ‘शिक्षकांची भूमिका’ याविषयी आयोजित ऑनलाइन झूम वेबिनार स्वरूपातील मार्गदर्शन कार्यशाळेत जेओंग हियुन युन बोलत होते.

शिक्षकांची भूमिका
१. शाळा सुटल्यानंतर कौशल्याधिष्टित व व्यवसायी प्रशिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून, शालेय आवारात आफ्टर स्कूल प्रशिक्षण उपक्रम राबवावा.
२. आफ्टर स्कूल प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेल्डिंग, वाहन देखभाल, बांधकाम, कृषी यंत्र देखभाल, बुलडोझर व क्रेन ऑपरेटर, संगणक-डिझाईन, पॉवरपॉईंट, एक्सेल, फोटोशॉप आणि थ्रीडी स्कॅनिंग असे विविध कौशल्याधिष्टित व व्यवसायभिमुख अभ्यासक्रम राबवावे.
३. कोईस नियमाप्रमाणे मासे फिश टॅंकमध्ये कमी प्रमाणात तर विहिरीत किंवा तलावात अधिक प्रमाणात आणि नदीमध्ये मुक्त प्रवाहात सर्वाधिक प्रमाणात वाढतात. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची बौद्धिक, कल्पना, मानसिक व वैचारिक शक्ती असते त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वाढीसाठी शिक्षकांनी अनेक बाबींचे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
४. प्रशिक्षित विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून एकत्र करून, त्यांना नवीन विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास प्रोत्साहित करणे.
५. विविध क्षेत्रातील रोल मॉडेल व यशस्वी मार्गदर्शकांना शाळेत बोलवून विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहनपर विविध मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित कराव्यात.
६. विद्यार्थ्यांसाठी कल्पना शक्तीला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करून, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे.