शाळा प्रवेशाची वयोमर्यादा वाढवली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शाळा प्रवेशाची वयोमर्यादा वाढवली
शाळा प्रवेशाची वयोमर्यादा वाढवली

शाळा प्रवेशाची वयोमर्यादा वाढवली

sakal_logo
By

आरटीई प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादा निश्चित
पुणे, ता. १ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अर्ज भरताना पालकांचा होणारा गोंधळ दूर होण्यास मदत होणार आहे. नर्सरी प्रवेशासाठी बालकाचे वय ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चार वर्ष पाच महिने ३० दिवस पूर्ण असणे आवश्यक आहे.

प्ले ग्रुप, नर्सरी, केजी, पहिली अशा विविध प्रवेश स्तरावर बालकांचे प्रवेश घेताना पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण विभागाने यापूर्वी ‘आरटीई’ प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा घोषित केली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी बालकांचे किमान वय किती असावे, हे यापूर्वीच निश्चित केले आहे. परंतु कमाल वयोमर्यादा आतापर्यंत देण्यात आली नव्हती.
तसेच जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा ३१ डिसेंबर २०२२ किती असावी, हे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार आता प्ले ग्रुप किंवा नर्सरीच्या प्रवेशासाठी ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत चार वर्ष पाच महिने ३० दिवस पूर्ण, अशी कमाल मर्यादा असणार आहे. तर इयत्ता पहिलीसाठी सात वर्ष पाच महिने ३० दिवस, अशी वयोमर्यादा असेल, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी स्पष्ट केले आहे.
असेल कमाल वयोमर्यादा

प्रवेशाचा वर्ग : वयोमर्यादा : ३१ डिसेंबर २०२२ रोजीचे कमाल वय
प्ले ग्रुप/नर्सरी : १ जुलै २०१८ ते ३१ डिसेंबर २०१९ : ४ वर्ष ५ महिने ३० दिवस
ज्युनिअर केजी : १ जुलै २०१७ ते ३१ डिसेंबर २०१८ : ५ वर्ष ५ महिने ३० दिवस
सीनियर केजी : १ जुलै २०१६ ते ३१ डिसेंबर २०१७ : ६ वर्ष ५ महिने ३० दिवस
इयत्ता पहिली : १ जुलै २०१५ ते ३१ डिसेंबर २०१६ : ७ वर्ष ५ महिने ३० दिवस