‘द नेक्स्ट फिफ्टी’ प्रदर्शनात ५० चित्रे उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘द नेक्स्ट फिफ्टी’ प्रदर्शनात ५० चित्रे उपलब्ध
‘द नेक्स्ट फिफ्टी’ प्रदर्शनात ५० चित्रे उपलब्ध

‘द नेक्स्ट फिफ्टी’ प्रदर्शनात ५० चित्रे उपलब्ध

sakal_logo
By

पुणे, ता. १ : ‘ड्राय पेस्टल’ या प्रकारातील चित्रांचे ‘द नेक्स्ट फिफ्टी’ हे अनोखे प्रदर्शन आर्ट गॅलरीत सुरू केले आहे. लोकांमध्ये चित्र साक्षरता वाढावी, त्यांनी वैविध्यपूर्ण चित्र पाहावीत आणि ड्राय पेस्टल प्रकाराची त्यांना ओळख व्हावी, असा या प्रदर्शनामागील उद्देश असल्याचे चित्रकार डॉ. शिरीष धारप यांनी स्पष्ट केले.
धारप यांनी त्यांच्या घरी ‘आसमंत’ या नावाची छोटी आर्ट गॅलरी सुरू केली आहे. या गॅलरीतील त्यांचे हे दुसरे चित्र प्रदर्शन आहे. या चित्र प्रदर्शनात ‘ड्राय पेस्टल’ या माध्यमाचा ताकदीने वापर करत त्यांनी रेखाटलेले सुमारे ५० चित्रे या प्रदर्शनात उपलब्ध आहेत. ते म्हणाले,‘‘सहसा चित्रकलेत ऑइल, वॉटर कलर किंवा ॲक्रेलिकमध्ये काम करतात. मात्र, पेस्टल किंवा सॉफ्ट पेस्टल हे माध्यम फारसे वापरले जात नाही. मी या प्रकारात गेली २० वर्षे काम करत आहे. सर्वसामान्यांना याची माहिती व्हावी आणि त्यांनी ही चित्रे समजून घ्यावीत, यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले आहे.’’दीप बंगला चौक जवळील आसमंत आर्ट गॅलरीत हे प्रदर्शन सुरू असून १८ मार्चपर्यंत सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ६ या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.