Wed, March 22, 2023

मिलिंद मुळीक यांच्या चित्रांचे रविवारपासून प्रदर्शन
मिलिंद मुळीक यांच्या चित्रांचे रविवारपासून प्रदर्शन
Published on : 1 March 2022, 12:02 pm
पुणे, ता. १ ः चित्रकार मिलिंद मुळीक यांच्या चित्रांचे प्रदर्शन येत्या रविवारपासून (ता. ६) भरवण्यात येणार आहे. ॲबस्ट्रॅक्ट, सेमी ॲबस्ट्रॅक्ट, सिटीस्केप आणि लॅन्डस्केप अशा चार प्रकारांतील चित्रे यात उपलब्ध आहेत.
याचे उद्घाटन शनिवारी (ता. ५) सायंकाळी सहा वाजता होणार आहे. यावेळी ‘रंग-तरंग’ हा चित्रकला आणि संगीताचे मिश्रण असलेला अनोखा जुगलबंदीचा कार्यक्रमही सादर होणार आहे. मिलिंद मुळीक आणि मानस गोसावी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. हे चित्र प्रदर्शन २० मार्चपर्यंत खुले असेल. कोरेगाव पार्क येथील मोनालिसा कलाग्राम येथे सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत नागरिकांना हे प्रदर्शन पाहता येईल, अशी माहिती मुळीक यांनी दिली.