Fri, March 24, 2023

काँग्रेसच्या पर्यावरण सेलच्या अध्यक्षपदी मारणे
काँग्रेसच्या पर्यावरण सेलच्या अध्यक्षपदी मारणे
Published on : 1 March 2022, 2:49 am
पुणे, ता. १ : शहर, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाच्या अध्यक्षपदी रामदास मारणे यांची नियुक्ती करण्यात आली. महसूल मंत्री आणि पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे अध्यक्ष समीर वर्तक आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी उपस्थित होते. थोरात म्हणाले, ‘‘तरुणाई यापुढे पर्यावरणाचे रक्षण करणारी सक्षम पिढी राहील. त्या भावनेतून मारणे यांची नियुक्ती केली आहे. पक्षाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व जनजागृतीचे कार्य मारणे समाजातील सर्व स्तरात घेऊन जातील.’’ या वेळी वर्तक, जोशी यांची भाषणे झाली.