‘नोकरी करताना कौशल्ये अद्ययावत ठेवावीत’

‘नोकरी करताना कौशल्ये अद्ययावत ठेवावीत’

पुणे, ता. ७ ः ‘‘कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतःचा छोटा स्टार्टअप व्यवसाय सुरू करताना किंवा नोकरी करताना कौशल्ये अद्ययावत ठेवावीत. दृष्टिकोनातील सकारात्मकता व नावीन्यता जोपासणेही अत्यंत महत्त्वाचे आहे,’’ असे मत भारत फोर्जच्या सीएसआर प्रमुख लीना देशपांडे यांनी व्यक्त केले. तसेच, प्रत्येकाने आपल्या कामाप्रती उत्कटता बाळगावी, असेही आवाहन केले.

यशस्वी संस्थेतर्फे आयोजित कौशल्य विकास प्रशिक्षण प्रशस्तीपत्र प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या उपायुक्त अनुपमा पवार, संस्थेच्या मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनीषा खोमणे, राजेश नागरे आदी उपस्थित होते. स्मिता धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. प्राची राऊत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com