‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे  
कार्यक्रमाचे आयोजन

‘बँक ऑफ महाराष्ट्र’तर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, ता. ४ : ख्रिसमसचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्राने ‘शेअरिंग हॅप्पीनेस’ उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत बँक ऑफ महाराष्ट्रने रॉयल एन्फिल्ड, बिसलेरी इंडिया, सूक्ष्म योग फाउंडेशन आणि ‘संपर्क बाल आशा घर’ यांच्या वतीने ‘संपर्क बाल आशा घर’ या स्वयंसेवी संस्थेच्या मुलांसोबत दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन केले.

पिंपळे सौदागर येथील नॉर्मडीक रॉयल एन्फिल्ड शोरूम येथून बाल आशा घर आंबवणे नांदगावपर्यंत रॉयल एन्फिल्डच्या वतीने सकाळी बाईक रॅली काढण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून ‘बाल आशा घर’ ची मुले सहभागी झाली होती. दिवसभरात मुलांनी योगासने, मजेदार खेळ तसेच झुंबा सत्र यामध्ये भाग घेतला.
बँक ऑफ महाराष्ट्र या मुलांसाठी सिक्रेट सॅन्टा बनून त्यांना ख्रिसमससाठी भेटवस्तू दिल्या. तरुण मुलांमध्ये आरोग्य, तंदुरुस्ती आणि खेळ यांना प्रोत्साहन देण्यासाठी, स्वयंसेवी संस्थेला बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे क्रिकेट किट भेट म्हणून देण्यात आले. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.
बँक ऑफ महाराष्ट्र ही देशातील अग्रगण्य राष्ट्रीयीकृत बँकांपैकी एक आहे. होम लोन, कार लोन, गोल्ड लोन, एमएसएमईलोन आणि इतर अनेक कर्ज उत्पादने आहेत. सध्या बँक ऑनलाइन कर्ज अर्ज सुविधेसह अनुक्रमे ६.४० टक्के आणि ६.८० टक्के दराने सर्वात कमी गृह आणि कार कर्ज देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com