महापालिकेच्या अभियंत्यास शिवीगाळ; दोघांवर गुन्हा

महापालिकेच्या अभियंत्यास शिवीगाळ; दोघांवर गुन्हा

पुणे, ता. ९ ः शिवाजीनगर येथील मेट्रो स्थानकाच्या कामासाठी झोपडपट्टीतील घरे पाडत असताना दोघांनी महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास शिवीगाळ करून ॲट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजता कामगार पुतळा पसिरात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महेंद्र मच्छिंद्र कांबळे (वय ४६) आणि गणेश मच्छिंद्र कांबळे (वय ४४) ही संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता अभिजीत टेंभुर्णे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेंभुर्णे हे पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यारत आहेत. कामगार पुतळा परिसरातील झोपडपट्टीच्या ठिकाणी मेट्रो स्टेशन उभारले जात आहेत. त्यासाठी तेथील झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. काही झोपडीधारक तेथून जात नसल्याने शनिवारी सकाळी तेथे स्थलांतर करण्याची कारवाई केली जात होती. त्या वेळी कांबळे यांनी फिर्यादीस आमच्या घरावर कारवाई करायची नाही, आम्हाला घराबाहेर काढू नका, तुम्ही आमच्यावर अन्याय करत आहात, तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकी देत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच तुमच्याविरुद्ध ॲट्रोसिटीनुसार तक्रार देऊ, जीवाचे बरे वाईट करू अशी धमकी देत त्यांनी घराबाहेर पडण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com