राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातूनच कंद यांना विजयाचा हात

राष्ट्रवादीच्या प्रभावक्षेत्रातूनच कंद यांना विजयाचा हात

पुणे, ता. ४ ः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीतील विजयासाठी भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांना बारामती, इंदापूर, आंबेगावसह तीन मंत्री आणि सत्तापक्षाच्या चार आमदारांच्या तालुक्यांनीच विजयासाठी मोठा हात दिला आहे. यासाठी कंद यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावर असतानाच्या कामगिरीचाही मोठा फायदा झाल्याची चर्चा जिल्ह्यात रंगू लागली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या इंदापूर तालुक्यांसह भोरचे कॉंग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, खेडचे राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील, शिरूरचे आमदार अशोक पवार आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांच्या तालुक्यांनी कंद यांना भरभरून मतदान केल्याचे मतमोजणीत पुढे आलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

याउलट कंद यांना त्यांचा स्वतालुका असलेल्या हवेली तालुक्यातील तुलनेने फारसे पाठबळ मिळाले नसल्याचे दिसून आले आहे. कंद यांना आंबेगाव, भोर, इंदापूर, जुन्नर, खेड, मुळशी आणि शिरूर यापैकी भोरचा अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व असलेल्या या सहा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत. शिवाय बारामती तालुक्यातून ५२ मते त्यांना मिळाली आहेत. मावळ तालुक्यात कंद आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार घुले यांना समान मते मिळाली आहेत. हीच मते कंद यांना विजयाच्या मार्गाकडे कारणीभूत ठरली आहेत.

या सात तालुक्यात कंद यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे (कंसात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली मते) ः आंबेगाव -२४ (१४), इंदापूर - २७ (१६), जुन्नर -६७ (२४), खेड -२२ (१२), मुळशी -१० (८), शिरूर - १६ (१५), भोर -१५(१०). हवेली तालुक्यातून कंद यांना ११८ तर सुरेश घुले यांना १३१ मते मिळाली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com