बालरंगमहोत्सव मे महिन्यात रंगणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालरंगमहोत्सव मे महिन्यात रंगणार
बालरंगमहोत्सव मे महिन्यात रंगणार

बालरंगमहोत्सव मे महिन्यात रंगणार

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बालगोपाळांचा ‘बालरंगमहोत्सव’ भेटीसाठी येत आहे. महाराष्ट्र कल्चर सेंटरच्या वतीने सात ते १५ मे या कालावधीत संस्थेच्या टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात आयोजन करण्यात येणार आहे. संध्याकाळी सहा ते सात या वेळात विविध गमती-जमती आणि ‘कट्टा परफॉर्मन्स’ झाल्यावर सात वाजता नाट्यप्रयोग सुरू होईल. मुलांशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील नाटके या महोत्सवात मंचित केली जाणार आहेत. महोत्सवाची सुरुवात ‘आदींबाच्या बेटावर’ या रहस्ययपूर्ण नाटकाने होणार आहे. महोत्सवासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे सेंटरच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महोत्सवात डॉ. अनिल अवचट यांच्या निवडक कथांचे कथाकथन, ‘ग्रिप्स’ची दोन नवी कोरी नाटके आहेत. त्यात ‘मिंग्लिश मीडियम, ‘आलं आमच्या लक्षात’ या नाटके तर ‘व्हेन रेनबो मीट्स अर्थ’ या नृत्यनाट्यकृती महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top