
डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना ‘झीप’कडून ‘ईव्ही’ची जोड
पुणे, ता. २३ : नागरिकांची वाढत असलेली पसंती आणि त्यासाठी पूरक धोरणे, यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचा (र्इव्ही) वापर सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यात आता काही स्टार्टअप एका ठराविक क्षेत्राच्या गरजा लक्षात घेऊन र्इव्ही तयार करीत आहे. हरियानातील अशाच एका स्टार्टअपने विविध प्रकारच्या वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांना र्इव्ही पुरविण्यावर लक्ष केले आहे. या स्टार्टअपने पाच हजार र्इव्ही बार्इक तयार केल्या असून, त्या माध्यमातून तीन हजार नागरिकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे, तर दोन हजार र्इव्ही बार्इक या भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत.
संपूर्ण देशातील वाहनांमधील कार्बन उत्सर्जन २०२५ पर्यंत शून्य टक्क्यांवर आणत २०३० पर्यंत दळणवळणात आणखी गतिशीलता आणण्याच्या उद्देशाने झीप (Zypp) या र्इव्ही स्टार्टअपची स्थापना केली आहे. विपणन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसाय वाढविण्याच्या क्षेत्राचा मोठा अनुभव असलेल्या आकाश गुप्ता आणि फॅशनबाबतचे स्टार्टअप व या क्षेत्रात काही वर्ष काम केलेल्या राशी अग्रवाल यांनी २०१७ मध्ये हे स्टार्टअप सुरू केले आहे.
झीप हे भारताचे एक आघाडीचे ईव्ही सेवा पुरविणारे प्लॅटफॉर्म आहे. या स्टार्टअपने स्थानिक व्यापाऱ्यांपासून ई-कॉमर्स, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह इलेक्ट्रिकचे बिझनेस मॉडेल तयार केले आहे. जे विविध कंपन्यांना डिलिव्हरीसाठी र्इव्ही पुरवते. स्टार्टअपच्या टचपॉइंटवर स्थापित केलेल्या स्वॅपिंग स्टेशनवर बॅटरीज बदलल्या जाऊ शकतात. इको-फ्रेंडली ईव्ही सेवा निर्माण झाल्याने प्रति डिलिव्हरी खर्च कमी होतो. तसेच, प्रदूषण कमी करण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा वापर होतो.
स्टार्टअपचे वैशिष्ट
- कार्बन उत्सर्जन वाचवले ः ८४,१३,४९२ किलो
- एकूण पायलट ः ३०००
- एकूण डिलिव्हरी ः ३६,७८,९९५
- र्इव्ही बार्इकची संख्या ः ३५००
स्टार्टअपची व्याप्ती
- पुणे, दिल्ली, गुडगाव, गाझियाबाद, नोएडा, फरीदाबाद, मुंबई, बंगळूर आणि हैदराबाद येथे कार्यरत
- देशात एकूण ३०० ग्राहक असून यावर्षाखेर १,००० भागीदारांपर्यंत पोहचण्याची योजना
दीडशे रुपये द्या, दिवसभर बार्इक वापरा
या स्टार्टअपने दोन हजार र्इव्ही बार्इक या भाडेतत्त्वावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यांचा दररोजचा बार्इकचा वापर जास्त आहे, अशा नागरिकांना ही बार्इक वापरणे फायद्याचे ठरत असल्याचा दावा स्टार्टअपने केला आहे. या बार्इकमध्ये उच्च कार्यक्षमतेच्या दोन बॅटरी असतात, तसेच बार्इक चार्जिंगसाठी सुविधा पुरविली जाते, काही अडचण आल्यास त्यास मदत केली जाते. दिवसभर १००-१२० किलोमीटरचा प्रवास करता येतो.
‘‘अद्ययावत तंत्रज्ञान आणि उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर केल्यास इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅटफॉर्म हे डिलिव्हरी आणि इतर सर्व प्रकारच्या मोबिलिटीला मजबूत आणि परवडणारी करेल. २०२५ पर्यंत कार्बन उत्सर्जन थांबवून २०३० पर्यंत मोबिलिटीला अधिक गतिशील करणे हा आमचा उद्देश आहे.’’
- आकाश गुप्ता व राशी अग्रवाल, सहसंस्थापक, झीप
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..