कोरोनाने आरोग्य केंद्रस्थानी आणले : गंगाखेडकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाने आरोग्य केंद्रस्थानी आणले : गंगाखेडकर
कोरोनाने आरोग्य केंद्रस्थानी आणले : गंगाखेडकर

कोरोनाने आरोग्य केंद्रस्थानी आणले : गंगाखेडकर

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : ‘‘कोरोना अजूनही पूर्णतः गेलेला नाही हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहिजे. नजीकच्या भविष्यात पूर्णपणे नवीन कोरोना व्हायरसदेखील येऊ शकतो. कोरोनाने आरोग्य केंद्रस्थानी आणले आहे. आरोग्य अजून काही काळासाठी केंद्रस्थानी राहावे, यासाठी आपल्याला समाजात प्रबोधन करावे लागेल,’’ असे मत ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) साथी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले.

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय (अभिमत) विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेतर्फे आयोजित ‘ट्रान्सफॉर्मिंग हेल्थकेअर : विथ अलाइड अँड हेल्थकेअर प्रोफेशनल्स’ विषयावरील ‘सिमहेल्थ २०२२’ या राष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी डॉ. गंगाखेडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी ‘सिंबायोसिस’चे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, विद्यापीठाच्या आरोग्य विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. राजीव येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. गंगाखेडकर म्हणाले, ‘‘कोरोनामुळे केवळ धोरणकर्त्यांनाच, नव्हे तर सामान्य नागरिकांनाही आरोग्य क्षेत्राचे महत्त्व कळाले आहे. परंतु कोरोनामुळे आपले क्षयरोग (टीबी) यांसारख्या इतर संसर्गजन्य रोगांकडे मात्र दुर्लक्ष झालेले आहे. आता या संदर्भात नवीन रणनीती आजमावण्यात येणार असून, त्यावर सरकारतर्फे दर आठवड्याला लक्ष ठेवण्यात येईल.’’ या परिषदेत हॉस्पिटल आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट प्रोफेशनल्स, मेडिको लीगल कन्सल्टंट, मेडिकल टेक्नॉलॉजिस्ट आणि पॅरामेडिक्स, क्लिनिकल रिसर्च प्रोफेशनल, थेरपिस्ट क्षेत्रातील सुमारे एक हजारांहून अधिक व्यावसायिक आणि संस्थांनी सहभाग नोंदविला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top