खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला अटक
खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला अटक

खंडणीच्या गुन्ह्यात रवींद्र बऱ्हाटेला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याला खंडणीच्या गुन्ह्यात शुक्रवारी (ता. २२) समर्थ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी शहरातील एका बांधकाम व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात जुलै २०२० मध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार, बऱ्हाटे याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण २०१८ मध्ये घडलेले आहे.
वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांचे खोटे कागदपत्रे तयार करून फसवणूक केली. त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात यापूर्वी सहा जणांना अटक केली होती. त्यानंतर आता बऱ्हाटे याला अटक केली आहे. बऱ्हाटे हा मोकाच्या गुन्ह्यात औरंगाबाद कारागृहात होता. कारागृहातून ताबा घेऊन त्याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top