एप्रिल अखेरपर्यंत एक लाख मिटर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एप्रिल अखेरपर्यंत एक लाख मिटर
एप्रिल अखेरपर्यंत एक लाख मिटर

एप्रिल अखेरपर्यंत एक लाख मिटर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : राज्यभरात तीस एप्रिलपर्यंत एक लाख तर पुढील महिन्या अखेरीस दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील, असा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पैसे भरूनही तीन तीन महिने मिटर न मिळालेल्या ग्राहकांना येत्या काही दिवसांत दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवीन सिंगल फेज मीटरचे जानेवारी महिन्यात पैसे भरूनही नागरिकांना अद्याप मीटर उपलब्ध न झाल्याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. पुणे शहराप्रमाणेच राज्यातील अन्य शहरांमध्ये देखील ही परिस्थिती असल्याचे समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून हा दावा करण्यात आले आहे. महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. त्याबरोबरच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलणे आदींसाठी महावितरणला दरमहा दोन लाख मीटरची आवश्यकता भासते. सद्यःस्थितीत २२ एप्रिलपर्यंत महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १ लाख ३१ हजार ८०२ मीटर उपलब्ध होतील. नवीन वीजमीटरच्या उपलब्धतेमध्ये आणखी वाढ करण्यासाठी येत्या सप्टेंबरपर्यंत १५ लाख नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचा आदेश पुरवठादारांना देण्यात आला आहे. त्यानुसार येत्या ३० एप्रिलपर्यंत एक लाख आणि मे महिन्यात दोन लाख नवीन वीजमीटर उपलब्ध होतील. त्यानंतर जून ते सप्टेंबरपर्यंत प्रत्येक महिन्यात तीन लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होत जाणार आहेत, असेही महावितरणने कळविले आहे.

प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण
दहा लाख स्मार्ट मीटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू आहे. १.५० लाख थ्रीफेज मिटर घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून या थ्रीफेज मीटरचा पुरवठा येत्या मे अखेरपर्यंत उपलब्ध होणार आहे. ग्राहकांची वाढती मागणी बघता आणखी २० लाख सिंगल फेज मिटर घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. शिवाय वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार कृषी वाहिन्यांचे ऊर्जा अंकेक्षण करण्यासाठी उच्चदाब वीज वितरण प्रणाली अंतर्गत वीजजोडणी दिलेल्या कृषी ग्राहकांना प्रिपेड मिटर बसविण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहेत. या कृषी ग्राहकांना दीड लाख प्रिपेड मीटर बसविण्याची प्रक्रिया डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत, असेही महावितरणने कळविले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top