मागासवर्गीय उद्योजकांसाठी मदत करणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मागासवर्गीय उद्योजकांसाठी मदत करणार
मागासवर्गीय उद्योजकांसाठी मदत करणार

मागासवर्गीय उद्योजकांसाठी मदत करणार

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : ‘‘आता मागणारे हात न होता देणारे हात व्हा. मागासवर्गीय उद्योजकांसाठी देण्यात येणाऱ्या ‘व्हेंचर कॅपिटल फंड’ योजनेसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल,’’ असे आश्वासन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभाग, २० मार्च फाउंडेशन आणि सावित्रीबाई फुले पुणे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्थिक समतेचे उद्दिष्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल कास्ट’ ही मागासवर्गातील उद्योगांची परिषद भरविली होती. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, उपमहापौर सुनीता वाडेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे, ‘डिक्की’चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, २० मार्च फाउंडेशनचे संस्थापक संचालक अविचल धिवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील धिवार आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात हे ऑनलाइनद्वारे सहभागी झाले होते.
‘व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल कास्ट’ या योजनेतील त्रुटी दाखवत ही योजना अधिक चांगल्या प्रकारे कशी राबविता येईल, याबाबत धिवार यांनी सादरीकरण केले. ‘‘व्हेंचर कॅपिटल फंडाप्रमाणे मागासवर्गीय नवउद्योजकांसाठी स्टार्टअप फंड द्यावा,’’ अशी मागणी कांबळे यांनी केली.

मागासवर्गीय उद्योजकांची संख्या ही त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यातही घरगुती व लहान स्वरूपातील व्यवसाय अधिक आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आणि मोठ्या उद्योगात मागासवर्गीयांची संख्या वाढवायची असेल तर त्यांच्या मूळ प्रश्नांवर काम करायची गरज आहे. आजही जातीयवाद हा एक प्रमुख प्रश्न यांच्यासमोर आहे. सरकारने आर्थिक मदत वाढवून या मूळ प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे.
- सुखदेव थोरात,
माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top