Torture young woman lure job sexually assaulted youth
Torture young woman lure job sexually assaulted youthsakal

नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार

तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना
Published on

पुणे : नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका तरुणाने २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार २२ एप्रिल रोजी रात्री घडला. याप्रकरणी पीडित तरुणीने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार संतोष संभाजी केंद्रे (वय ३०, रा. लोहगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. संतोष याने फिर्यादी तरुणीला नोकरी देण्याचे आमिष दाखविले. तसेच, तिला भाडेतत्त्वावर खोली दाखविण्याच्या बहाण्याने घरी नेले. तेथे त्याने रात्री तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून व्हिडिओ क्लिप तयार केली. ही बाब कोणाला सांगितल्यास क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली. परंतु, तरुणीने धमकीला न घाबरता पोलिस ठाणे गाठून त्याच्याविरोधात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com