
गुन्हे वृत्त
लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
पुणे, ता. २४ : लग्नाचे आमिष दाखवून एका २८ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना कोंढवा येथील एका हॉटेलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित तरुणीने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी सातारा येथील सौरभ दिलीप माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणीने सौरभ याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता तो टाळाटाळ करीत होता. त्याने लग्नास नकार देत मारहाण केल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.
------
विद्यार्थिनींच्या पर्समधून दागिने, रोकड लंपास
पुणे, ता. २४ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळेतून चोरट्याने दोन विद्यार्थिनींच्या पर्समधून सोन्याचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. याप्रकरणी विद्यार्थिनीने (वय २६, रा. औंध) तक्रार दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोघीजणी प्रयोगशाळेत पर्स ठेवून क्लासरूमध्ये अभ्यास करीत होत्या. त्यावेळी पर्समधील ऐवज चोरी करून चोरटा पसार झाला.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..