बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन
बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन

बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन

sakal_logo
By

बिझनेस अकाउंटिंग व टॅक्सेशन
पुणे, ता. २५ : एपीजी लर्निंगचे सर्वाधिक यशस्वी प्रशिक्षण ३ मेपासून सुरु होत आहे. अकाउंटंट प्रोफेशनल बनण्यासाठी जे स्किल सेट गरजेचे असतात ते सर्व या कोर्समध्ये पूर्ण केले जाणार आहेत. व्यावसायिक संस्था आणि उद्योगांना पेरोल व फायनान्शियल मॅनेजमेंटसाठी अकाउंटंट लागत असतात. हे एक उत्तम करिअर आहे. यातून पुढे मोठ्या संधीही उपलब्ध होतात. या प्रशिक्षणात इंडस्ट्रिअल अकाउंटिंग, टॅली, डायरेक्ट टॅक्सेशन, जीएसटी, इन्कम टॅक्स, टीडीएस, पे-रोल कॉम्पोनन्ट्स, ईआरपी सॉफ्टवेअर यासह एमएस एक्सेल व एमआयएस रिपोर्टिंग आदींबाबत मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क : ७३५०००१६०२
--------------------------------
सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

मशरूम उत्पादन व्यवसाय कार्यशाळा
पुणे, ता. २५ : स्थानिक मार्केट, हॉटेल्समध्ये वाढती मागणी असणाऱ्या बटण तसेच ओयिस्टर मशरूमचे उत्पादन, व्यवसायासाठी आवश्‍यक भांडवल गुंतवणूक इ.बाबत लेखी आणि प्रात्यक्षिकासह माहिती करून देणारी दोन दिवसांची प्रशिक्षण-कार्यशाळा २९ व ३० एप्रिल रोजी आयोजिली आहे. मशरूममध्ये भरपूर पोषक गुणधर्म असल्याने त्याचा वापर दररोजच्या आहारात केला जातो. त्यामुळे कमर्शिअल पद्धतीने उत्पादन घेतल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. तसेच हा व्यवसाय छोट्या जागेत, कमी भांडवलात सुरू करणे शक्‍य असल्याने कोणीही हा व्यवसाय करू शकतो. उत्पादन पद्धती, मागणी व पुरवठा, स्पॉन उत्पादन, व्यवसायासाठी अपेक्षित गुंतवणूक, बॅंक फायनान्स, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, उपलब्ध मार्केट इ. विषयी कार्यशाळेत मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती शुल्क चार हजार पाचशे रुपये.
संपर्क: ७४४७४४३१९८
----------------------------------------------------

लेअर पोल्ट्री व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळा
तीनशे ते पाचशे पक्ष्यांचा छोटा व्यावसायिक लेअर (अंडी देणाऱ्या कोंबड्या) पोल्ट्री फार्म कसा सुरू करावा, सुरवातीचे नियोजन, अपेक्षित भांडवल गुंतवणूक, लेअर पक्ष्यांचे संगोपन, पिंजरे, खाद्य व्यवस्थापन, अंड्यांचे कलेक्‍शन, हाताळणी, व्यावसायिकदृष्टीने नफा-तोट्याचे अर्थशास्त्र, मार्केट, लेअर पोल्ट्री यशस्वी करण्याची सूत्रे इ.विषयी दोन दिवसीय कार्यशाळा २९ व ३० एप्रिल रोजी आयोजिली आहे. छोटा लेअर पोल्ट्री उद्योग करण्यास भरपूर वाव आहे. अशा छोट्या स्तरावरील लेअर पक्ष्यांच्या यशस्वी फार्मला शिवारफेरी आयोजिली आहे. प्रतिव्यक्ती शुल्क तीन हजार पाचशे रुपये.
संपर्कः ८६६९६८९०१५
----------------------------------------------------
ठिकाण: सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top