तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या स्पा मालकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या स्पा मालकास अटक
तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या स्पा मालकास अटक

तरुणींकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या स्पा मालकास अटक

sakal_logo
By

पुणे, ता. २५ ः तरुणींना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेणाऱ्या एका स्पा सलूनच्या मालकास गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने अटक केले. मनीष सुरेशचंद मुथा (वय ५०, रा. कोंढवा खुर्द) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी ‘ऑरा स्पा सलून’वर कारवाई केली होती. त्यावेळी तरुणींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार, पोलिसांकडून तरुणींची सुटका करून काही जणांना अटक केली होती. दरम्यान, या संबंधित स्पाचा भागीदार असलेला मनीष मुथा हा एका गुन्ह्यात यापूर्वीच येरवडा कारागृहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्यास चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यामध्ये त्यास अटक करण्याबाबतचा अर्ज न्यायालयाकडे केला. त्यानुसार, न्यायालयाने त्यास परवानगी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top