‘ओबीसी आरक्षणासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ओबीसी आरक्षणासाठी  
‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करा’
‘ओबीसी आरक्षणासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करा’

‘ओबीसी आरक्षणासाठी ‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करा’

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर ओबीसी आरक्षण लागू करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाची ‘ट्पिल टेस्ट’ पूर्ण केल्याशिवाय सरकारला राजकीय आरक्षण देणे शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करावी, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाने केली आहे.
‘ट्रिपल टेस्ट’नुसार राज्यातील आरक्षणासाठी आयोगाच्या शिफारशींनुसार आरक्षणाचे प्रमाण नमूद करणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीयांच्या नावे एकूण राखीव जागांची टक्केवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी. त्यामुळे सरकारने ‘ट्रिपल टेस्ट’ची पूर्तता करावी, अशी मागणी भाजपच्या ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश पिंगळे यांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top