‘शिष्यवृत्ती’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करा ः डॉ. बोंदर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिष्यवृत्ती’साठी ३१ मार्चपर्यंत
अर्ज करा ः डॉ. बोंदर
‘शिष्यवृत्ती’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करा ः डॉ. बोंदर

‘शिष्यवृत्ती’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करा ः डॉ. बोंदर

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ३१ मार्चपर्यंत महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी केले आहे.
राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे उच्च शिक्षण विभागाच्या १४ शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाइनद्वारे अंमलबजावणी करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनांबाबत ‘https://mahadbtmahait.gov.in’ संकेतस्थळावर अधिक माहिती दिली आहे. त्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक साहाय्य, गुणवान विद्यार्थ्यांना आर्थिक साहाय्य योजना (कनिष्ठ स्तर) व (वरिष्ठ स्तर), राज्य शासनाची दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती, राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित व भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, राज्य शासनाची अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग-२), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक साहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक साहाय्य या योजनांचा समावेश आहे. जास्तीत जास्त पात्र विद्यार्थ्यांनी मुदतपूर्व या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन उच्च शिक्षण विभागातर्फे केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top