डोंबिवलीत महिलेचा मृतदेह सोफ्यात कोंबला

डोंबिवलीत महिलेचा मृतदेह सोफ्यात कोंबला

डोंबिवली, ता. १६ ः महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची घटना डोंबिवलीत घडली. हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील सोफ्यात कोंबून ठेवल्याने खळबळ उडाली आहे. सुप्रिया शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पाच पथके तयार करण्यात आली आहेत. महिलेच्या हत्येची ही गेल्या काही दिवसांतील दुसरी घटना आहे.
जानेवारीत डोंबिवली ५८ वर्षीय महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. दावडी गावातील ‘ओम रेसिडेन्सी’ इमारतीत सुप्रिया पती किशोर आणि मुलगा श्लोक याच्यासह राहत होत्या. मंगळवारी सकाळी किशोर कामावर गेल्यानंतर प्रकृती ठीक नसल्याने सुप्रियाने शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीला मुलाला शाळेत सोडण्यास सांगितले; मात्र दुपारी मुलास घेण्यासाठी त्या शाळेत न आल्याने शिक्षकांनी श्लोक याला काही वेळ वर्गातच थांबवून ठेवले. सुप्रिया यांची मैत्रीण शाळेत आल्यानंतर त्यांच्या ताब्यात श्लोक याला सोपवले. त्याबाबतची माहिती किशोर यांना देण्यात आली. त्याच वेळी सुप्रिया यांना संपर्क साधला असता त्या फोन उचलत नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर सुप्रिया यांच्या मैत्रिणीने शेजाऱ्यांकडील चावी घेऊन दार उघडले असता त्या घरात आढळल्या नाहीत.
किशोर सायंकाळी घरी परतल्यानंतर त्यांनी सुप्रियाचा शोध घेतला; मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली; मात्र शेजाऱ्यांनी सुप्रिया यांचा पुन्हा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खोलीतील सोफा अस्ताव्यस्त अवस्थेत आढळला. त्यात सुप्रिया यांचा मृतदेह कोंबण्यात आल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. त्यानंतर शेजाऱ्यांनी किशोर यांना ही माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
...
पाच पथके
वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे, निरीक्षक अनिल पडवळ आणि सहायक निरीक्षक अविनाश वणवे यांनी घटनास्थळी पाहणी केली. सुप्रिया यांचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com