एसआयआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयआयएलसी
एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

sakal_logo
By

मत्स्यपालन व्यवसायातील संधींवर कार्यशाळा
पुणे, ता. ४ : गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायातील संधी, माशांच्या जाती, मत्स्यबीज संवर्धन, शास्त्रोक्त काढणी व व्यवस्थापन, पिंजरा/जाळी पद्धतीने मासेपालन, मासेपालानातून कमी भांडवलात अधिक उत्पन्न कसे मिळवावे, आदींविषयी मार्गदर्शन करणारी ऑफलाइन कार्यशाळा १५ व १६ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये पहिल्या दिवशी माशांचे विक्री व्यवस्थापन, समग्र बाजारपेठ व त्यातील संधी याविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथे फिल्ड व्हिजिट असणार आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रुपये. यात चहा, नाश्ता, जेवण, प्रशिक्षण सामग्री व प्रवासखर्च यांचा समावेश आहे.
संपर्क : ७६६६२३९४८७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

ॲग्री कमोडिटी मार्केटविषयी कार्यशाळा
ॲग्री कमोडिटी मार्केट म्हणजे काय, आपला त्याच्याशी काय संबंध आहे, कमोडिटी ही मालमत्ता असू शकते का, या मार्केटमध्ये गुंतवणूक करून कसा फायदा होतो, याची माहिती देणारी ऑफलाइन कार्यशाळा २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यात कमोडिटी मार्केटचा अभ्यास असणारे जाणकार तज्ज्ञ कमोडिटी बाजाराची वेगवेगळी रूपे, वायदे बाजाराचा शोध, संकल्पना व उपयुक्तता, कमोडिटी बाजार संलग्न सुविधांचा कृषी क्षेत्रासाठी लाभ, किंमत निश्चिती, जोखीम व्यवस्थापन अर्थात हेजिंग म्हणजे काय, वायदेबाजारात ट्रेडिंग कसे करावे इ.विषयांवर मार्गदर्शन करतील. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.
संपर्क : ९८८१०९९७५७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

(वरील दोन्ही कार्यशाळांचे ठिकाणः एसआयआयएलसी, सकाळनगर, बाणेर रोड, पुणे)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top