धनादेश न वटल्याप्रकरणी शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनादेश न वटल्याप्रकरणी शिक्षा
धनादेश न वटल्याप्रकरणी शिक्षा

धनादेश न वटल्याप्रकरणी शिक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : बांधकाम केल्यानंतर दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने महिलेला सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तक्रारदाराला नुकसानभरपाई म्हणून २३ लाख रुपये एका महिन्याच्या आत देण्यात यावेत, असेही अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. अनिता रमेश पाडळे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. अन्य एका व्यक्तीवरही या बाबत आरोप होते. मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. महेंद्र पासलकर यांनी ॲड. विनोद दत्तात्रेय आंबाड यांच्यामार्फत या बाबतचा खटला दाखल केला होता.

तक्रारदार बांधकाम व्यावसायिक आहेत. आरोपीला भूखंडावर बांधकाम करायचे होते. त्यामुळे त्यांनी तक्रारदारांकडे कोटेशन मागितले. आरोपीचे सात हजार ३५९ स्क्वेअर फूटचे बांधकाम तक्रारदार यांनी पूर्ण केले. त्या बदल्यात करारानुसार ८० लाख ९४ हजार ९०० रुपये द्यायचे होते. त्यापैकी ५४ लाख ९३ हजार रुपये देण्यात आले. तर उर्वरित २६ लाख एक हजार पैकी आरोपीने दिलेला २० लाखांचा धनादेश न वटल्याने हा दावा दाखल करण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top