भांबुर्डा वनविहारातील मोर पाण्यासाठी व्याकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Peacock
भांबुर्डा वनविहारातील मोर पाण्यासाठी व्याकूळ

भांबुर्डा वनविहारातील मोर पाण्यासाठी व्याकूळ

पुणे - कडक उन्हाचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही (Animal and Bird) होत आहे. वेताळटेकडी परिसरातील भांबुर्डा वनविहाराचे (Bhamburda Forest) आकर्षण असलेल्या मोरांनाही (Peacock) पाण्यासाठी (Water) वणवण करावी लागत आहे. येथील मोरांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) जवळील टेकडीकडे स्थलांतर केल्याची माहिती परिसरात फिरायला येणाऱ्या प्राणिमित्रांनी दिली.

काय होते, काय झाले?

 • भांबुर्डा मयूर वनविहारात एकेकाळी ५० ते ६० मोर होते

 • उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी, पुरेसे अन्न नसल्याने अनेक मोरांचे स्थलांतर

 • आता फक्त सहा मोर, २० ते २५ लांडोर आहेत

अशी आहे स्थिती

 • अशोक खडसे उपवनसंरक्षक असताना त्यांनी तीन पाण्याच्या टाक्या बांधल्या

 • फॉरेस्ट बंगल्यातून पाइपलाइनद्वारे टाक्यांमध्ये पाणी सोडण्याची सोयही केली

 • टेकडीवर फिरण्यास येणाऱ्यांनी मोरांसाठी ठिकठिकाणी खापराच्या कुंड्या ठेवल्या

 • हौदातून प्लॅस्टिक डब्याने पाणी काढून मयूरमित्र या कुंड्यात पाणी भरतात

 • सध्या हौदात पुरेसे पाणी सोडले जात नसल्याने कुंड्या भरता येत नाही

 • गेल्या महिन्यापासून ते कोरडेच

 • वनविभागाचेही त्याकडे दुर्लक्ष

 • पाण्यासाठी मोर व इतर पक्ष्यांवर भटकंतीची वेळ

 • मयूरमित्रांकडून घरून पाणी आणून मोरांची तहान भागविण्याचा प्रयत्न

असा बसला फटका

 • वनात अनेक ठिकाणी ब्रेकर लावून मोरांच्या अधिवासात निरुपयोगी तळी व खोल चर खणण्यात आले

 • त्यात झाडे-झुडपे पडून मोरांची आश्रयस्थाने नष्ट झाली

 • पाळीव डुकरे व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाटही वाढला

 • गेल्या हंगमात मोरांची सर्व पिले कुत्र्यांनी खाल्ली

 • मोरांचा अधिवास आता उद्‍ध्वस्त झाला

 • चंदन चोरांचा सुळसुळाटही मयूरवनात वाढला आहे

बागेसाठी पाणी; पण पक्षी तहानलेले

भांबुर्डा वनविहाराच्या परिसरात लाखो रुपये खर्च करून बाग तयार केली आहे, मोरांचा अधिवास भकास आहे. बागेसाठी पाण्याची लयलूट आहे, पण मोर व इतर छोटे पक्षी तहानलेले आहेत. याकडे वरिष्ठ वनअधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून मोरांसाठी पाण्याची सोय करावी, अशी मागणी लेखक सुरेशचंद्र वारघडे, पांडुरंग आंग्रे, शंकरराव धोत्रे व अन्य मयूरमित्रांची मागणी आहे. मोरांना नैसर्गिक खाद्य पुरेसे उपलब्ध होत नसल्याने मयूरमित्रांनी धान्य टाकून मोरांना जगविले आहे.

वन अधिकारी म्हणतात...

भांबुर्डा वनविहाराच्या परिसरातील मोरांच्या स्थलांतर होत आहे की नाही हे प्राणी व पक्षी मित्रांची निरीक्षणे आहेत. त्यांनी कोणत्या अभ्यासाच्या आधारावर ही निरीक्षणे केली आहेत हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या यावर काही बोलता येणार नसल्याचे वन विभागातील अधिकाऱ्यांना विचारल्यास त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punewaterForestpeacock