
पुणे विमानतळावरून दिवसाला ८० विमानांचे उड्डाण
पुणे - पुणे (लोहगाव) विमानतळावरून (Pune Airport) उड्डाण करणाऱ्या विमानांच्या (Plane) संख्येत वाढ झाली आहे. सध्या दिवसाला ८० विमानांचे उड्डाण होत असून, यातून जवळपास ३४ ते ३५ हजार प्रवाशांची वाहतूक (Passenger Transport) होत आहे. कोरोनाकाळातील परिस्थिती आता पूर्वपदावर आली असून, प्रवाशांनी विमानतळ गजबजल्याचे दिसून येत आहे. पुणे विमानतळाच्या समर शेड्यूलला सुरुवात झाल्यानंतर विमानाच्या संख्येतही वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी पुणे विमानतळावरून दररोज सरासरी ८० ते ८२ विमानांचे उड्डाण होत होते. सध्या विमानांची संख्या ८० पर्यंत पोचली आहे.
दिल्लीला सर्वाधिक उड्डाणे -
पुण्याहून सर्वांत जास्त उड्डाणे ही दिल्लीसाठी होत आहेत. दिवसाला किमान २१ विमाने दिल्लीला जात आहेत. दिल्लीनंतर बंगळूरला जाणाऱ्या विमानांची संख्या जास्त आहे. बंगळूरला दिवसाला १२ ते १३ विमाने जातात.
तर विमानाच्या संख्येत आणखी वाढ -
पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. ही संख्या अशीच वाढत राहिल्यास काही दिवसांत विमानांच्या संख्येत आणखी वाढ होईल. मात्र, त्यात नवीन शहरांपेक्षा सध्या ज्या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. त्याच शहरांसाठीच्या विमानांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अधिक आहे.
समर शेड्यूलमध्ये प्रवासी संख्येत आणि विमानांच्या संख्येत वाढ होत आहे, ही समाधानाची बाब आहे. येत्या काही दिवसांत विमानांच्या संख्येत वाढ होईल, अशी आशा आहे.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे (लोहगाव)
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..