
पीएमपीचा आज ‘बस डे’
पुणे : सार्वजनिक वाहतुकीचे महत्त्व प्रवाशांना पटवून देण्यासाठी पीएमपीने शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सोमवारी (ता. १८ ) ‘बस डे’ आयोजित केला आहे. या निमित्ताने सुमारे २५० जादा बस प्रवाशांसाठी उपलब्ध होतील. त्यामुळे सोमवारी १८०० बसेस रस्त्यावर धावतील आणि सुमारे १२ लाख प्रवासी संख्येचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे.
पीएमपीच्या सध्या सरासरी रोज १५५० बस मार्गांवर धावतात. जादा २५० बसमुळे दोन ते अडीच लाख प्रवाशांची सोय होणार आहे. सध्या पीएमपीने प्रवास करणारे रोजचे सुमारे १० लाख ५० हजार प्रवासी आहेत. ही संख्या १२ लाखांपेक्षा जास्त करण्याचे प्रशासनाने ठरविले आहे. वर्धापन दिनामित्त आणि ‘बस डे’साठी पीएमपीने जागरूकतेसाठी शहरात विविध फलक लावले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनही केले आहे. सुमारे आठ दिवसांच्या कार्यक्रमांचे नियोजन प्रशासनाने केले आहे, अशी माहिती पीएमपीच्या सहव्यवस्थापक संचालक चेतना केरूरे यांनी दिली.
पीएमपीचे वाहतूक व्यवस्थापक राजेश रूपनगर म्हणाले, ‘‘दोन्ही शहरांत सोमवार, मंगळवार आणि बुधवारी पुरेशा संख्येने बस धावतील, याचे नियोजन तयार झाले आहे. त्यासाठी जादा मनुष्यबळही नियुक्त करण्यात येईल.’’
वैशिष्ट्ये....
सोमवारी १८०० बस रस्त्यांवर धावणार
मंगळवारी पुणे-पिंपरीत ५ आणि १० रूपयांत प्रवास
मंगळवारी पुण्यदशम बसचा मोफत प्रवास
बुधवारी ६० रुपयांचा दैनिक प्रवासाचा पास महिलांना अवघ्या १० रूपयांत मिळणार
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..