टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेम्पोच्या धडकेत 
तरुणाचा मृत्यू
टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : दुचाकीस्वार तरुणाचा टेम्पोच्या धडकेत मृत्यू झाला. शिवणे परिसरात मंगळवारी (ता. २९) ही घटना घडली. या प्रकरणी टेम्पोचालकास अटक केली आहे. साहिल रेवणनाथ वाळुंज (वय २०, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी टेम्पो चालक पांडुरंग लक्ष्मण दाभाडे (वय ३३, रा. कोथरूड) याला अटक केली आहे. पोलिस शिपाई सागर जगताप यांनी याबाबत वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार वाळुंज शिवणे भागातील एनडीए मैदानासमोरून निघाला होता. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या वाळुंजचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक आर. ए. पारवे तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..