परदेशात नोकरी लावण्यावरून चौघांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परदेशात नोकरी लावण्यावरून चौघांची फसवणूक
परदेशात नोकरी लावण्यावरून चौघांची फसवणूक

परदेशात नोकरी लावण्यावरून चौघांची फसवणूक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० : आॅस्ट्रेलियामध्ये नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने कोथरूडमधील एका महिला डॉक्टर आणि त्यांच्या मुलाने चौघांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर महिलेने मुलाच्या नावाने जे. एस. सी. ओव्हरसीज कन्सल्टंट ही कंपनी सुरू केली होती. त्यामाध्यमातून फसवणूक केली आहे.
डॉ. स्नेहा जोगळेकर असे या डॉक्टरचे नाव असून त्यांच्यासह मुलगा वरुण जोगळेकर यांच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात फसवणुकसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी संतोष बाबूलाल कनोजिया (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार आणि त्यांच्या तीन मित्रांना ऑस्ट्रेलियात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. नोकरीसाठी ऑस्ट्रेलियन मॅरीटाइम क्रु (९८८) हा खोटा व्हिसा दिला. त्यासाठी तक्रारदारांकडून सहा लाख रुपये घेतले. तर, इतर तीन व्यक्तींकडूनही पैसे घेण्यात आले. परंतु, पैसे दिल्यानंतर देखील त्यांना नोकरी लावली गेली नाही. नोकरी मिळाली नाही, त्यामुळे ते पैसे मागण्यास गेले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक किसन राठोड करीत आहेत.

महिलेला दोन लाखांची लावली फूस
चांगली नोकरी लावण्याच्या आमिषाने एका महिलेची दोन लाख रुपायांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ३० वर्षीय महिलेने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनोळखी मोबाईल धारक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारांना व्हॉट्सअपवर मेसेजकरून चांगली नोकरी लावण्याचे आमिष दाखविले होते. त्यासाठी त्यांच्याकडून एक लाख ९० हजार रुपये घेतले. परंतु, त्यांना नोकरी लावली नाही. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..