चापेकर बंधूंचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी

चापेकर बंधूंचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी

Published on

पुणे, ता. ३० ः आज आपण स्वतंत्र भारतात राहतो आहोत, पण हे स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य क्रांतिकारकांनी आपल्या आयुष्याचा त्याग केला आहे. यात चापेकर बंधूचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. देशाच्या स्वात्रंत्र्यासाठी तीन सख्खे भाऊ फासावर जाण्याची दुसरी घटना नाही. देशासाठी आपल्या आयुष्याचे समर्पण आणि त्यागाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चापेकर बंधू. त्यांचे चरित्र तरुण पिढीसाठी अजही अत्यंत प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले. चापेकर बंधूंनी केलेल्या रँड वधाच्या १२५ व्या वर्षानिमित्त ब्राह्मण जागृती सेवा संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
शेवडे पुढे म्हणाले, ‘‘दुर्दैवाने क्रांतिकारकांचे योगदान आणि पराक्रम शिकवण्याची व्यवस्था आपल्याकडे नसल्याने व्याख्याने आणि चरित्र ग्रंथातूनच ते समजून घ्यावे लागते, खरेतर स्वत्व आणि देशाभिमान यासाठी क्रांतिकारकांची चरित्रे शालेय पुस्तकातून शिकवली जायला हवीत.’’
डॉ. शेवडे यांनी लिहिलेल्या ‘रक्तलांछन’ आणि ‘डावी विषवल्ली’ या पुस्तकांचे प्रकाशन राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दीक्षित यांची दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास आशिष देवधर, योगेश अत्रे, रोहन जोशी उपस्थित होते.

क्रांतिकारकांचे चरित्र आजच्या तरुण पिढीपर्यंत पोचण्यासाठी असे जाहीर कार्यक्रम मोठ्या संख्येने होणे आवश्यक आहे. अगदी कमी वयातच देशप्रेम आजच्या पिढीत रुजवले पाहिजे. क्रांतिकारकांनी ज्या प्रमाणे कायम देशाचाच विचार केला त्याप्रमाणे आपणही स्वतःसोबत आपला देश मोठा होण्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत असले पाहिजे. हेच खरे त्या क्रांतिकारकांना वंदन ठरेल.
- प्रवीण दीक्षित, माजी पोलिस महासंचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com