दुःख जरी असले तरी खंत नाही! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुःख जरी असले तरी खंत नाही!
दुःख जरी असले तरी खंत नाही!

दुःख जरी असले तरी खंत नाही!

sakal_logo
By

लोगो------प्रासंगिक

लीड------------‘Dye With Memory Not With Dreams’! आपल्या स्टेट्सच्या या ओळी तंतोतंत जगणारी, नुकतीच अपघातात मृत्युमुखी पडलेली प्रियम राठी ही जरी माझी लेक असली तरी एका अर्थाने ती समाज कन्याच जणू. सामाजिक क्षेत्रात तिचा शिरकाव झाला तो वयाच्या सातव्या वर्षी शिवमुद्रा ढोल पथकाचा टिपरू हाती घेतल्यामुळे.

दुःख जरी असले तरी खंत नाही!

सत्येंद्र राठी

गड किल्ले, वारसा स्थळे, निसर्गात भटकंतीची आवड असलेल्या प्रियमने आपल्या हौसेला व्यवसायाचा स्वरूप देण्यासाठी अभिप्रेत असलेला अभ्यासक्रम दहावीच्या वर्षीच पूर्ण केला. या वयात ही इतकी समज कोठून आली? याचे उत्तर माझ्याकडे तरी नाही. तिने एकदा भर रस्त्यावर कोसळलेल्या प्रौढ व्यक्तीला सीपीआर देऊन त्याचे प्राण वाचविले, हा तिचा समाजोपयोगी ठरलेला पहिला पाऊल. त्यावेळी तिचे वय सोळा असावे.
तिच्या चर्येवर कुतूहल आणि उत्सुकता कायमच पसरलेली असे. न समजलेल्या गोष्टींचा छडा लावल्याशिवाय ती स्वस्थ बसत नसे, विश्व हिंदू परिषदचे नेते अशोक सिंघल हे घरी मुक्कामी असताना हिंदू धर्म व्यवस्थेबद्दल तिला पडलेल्या प्रश्नांनी तिने त्यांना भंडावून सोडलेले आज ही स्मरते. तिचे शिक्षण इंग्रजीत झाले असले तरी तिचे पहिले प्रेम मराठीवर होते. स्वातंत्र्यवीर सावरकर हे तिचे दैवत.
तारुण्यसुलभ चुका होणे स्वाभाविक; ती चूक पुन्हा होणार नाही याची ती काळजीही घेत, पण नवीन चूक मात्र न चुकता करत. मागे मेघालयला असताना तेथील आदिवासी भागात तिला दारू सदृश पेय पिण्याचा आग्रह स्थानिकांनी केला. तिने मला तेथून ‘ते पिऊ का?’ असे फोन करून विचारले. मी तसे न करण्याची केलेली सूचना तिने मानली. खरं तर तिथे बघणारे कोणी नव्हते, पण नात्यातला विश्वास तिने ढळू दिला नाही. ती मंदिराच्या उत्सवातही रमत तर डिस्कोतही थिरकत. सगळंच करायचं या आविर्भावात राहणारी प्रियम, फोटोग्राफी तसेच मॉडेलिंगही करे, रेडिओवर कहाणीही सांगत.
‘पत्रकार’ होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रियमने नुकतेच मोडी लिपीचे वर्गही पूर्ण केले होते. एकूण काय, तर साचेबद्ध जगणे तिला कधीच जमले नाही. भटकंतीसाठी लागणारे खर्च उभे करण्यासाठी ती ‘प्रिय आम’ या नावाने ती आंबेही विकत. तिच्या जगण्यात भय, भीड, संकोच इत्यादी गोष्टींना थारा नसल्याने नकार पचविणेही तिला सोपे जात.
पहिल्या कोविडमध्ये गरवारे येथील कोविड सेंटरला स्वयंसेविका म्हणून रुजू होण्याची तिची इच्छा, ती सज्ञान नसल्यामुळे नाकारली गेली. पण सकाळ सोशल फाउंडेशन व मुकुंद भवन तथा श्रीराम मंदिर ट्रस्टच्या माध्यमाने उभारण्यात आलेल्या अन्न वाटप कार्यात तिने स्वतः ला झोकून दिले. अंदाजे सव्वा दोनशे मुलांना पाकिटं वाटण्याचे काम ती रोज करत. लसीकरणातही ती आघाडीवर होती.
‘झाले गेले विसरून जावे’, या सूत्राचे अवलंबन करत, सगळ्यांच्या अडचणीत पहिली उभी राहणाऱ्या प्रियमच्या अंत्यसंस्काराच्या वेळी उसळलेली गर्दी, तिने निर्माण केलेल्या मैत्री संबंधाची ग्वाही देणारे ठरले.
प्रियमचे विशीत जाणे चटका लावणारे असले तरी ती जितकी जगली बेफाम जगली. तिच्या जाण्याचे दुःख जरी असले तरी खंत मात्र नाही,
कारण एक शायर म्हणतो,
किसी की चार दिन की जिंदगी सौ काम करती हैं,
किसी की सौ बरस की जिंदगी से कुछ नहीं मिलता।

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..