पुण्यात छावा संघटनेचे आंदोलन
पुणे, ता. १ : शहरातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखावा, गॅस एजन्सी आणि डिलिव्हरी बॉय हे ग्राहकांकडून सिलिंडरच्या किमतीपेक्षा जास्त पैसे घेत असून, ते बंद करण्यात यावे, या मागण्यांसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतेच आंदोलन करण्यात आले.
संघटनेच्यावतीने मागण्यांचे निवेदन या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. मोठ्या गॅस सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस रिफिलिंग बंद करण्यात यावे, गॅस एजन्सीने ग्राहकांना सिलिंडर देताना वजन करून द्यावे, घरगुती गॅस सिलिंडरमधून डिलिव्हरी बॉयकडून होणारी गळती थांबविण्यात यावी, आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. छावा संघटनेचे मच्छिंद्र चिंचोळे, नीलेश जाधव, आशिष खंडेलवाल, शरद कुंभार, जसवीन कौर छाबडा, राहुल धस, माधुरी सांगळे आदी या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.