
पाटणकर, डॉ. गोखले यांचा पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान
पुणे, ता. २१ : केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘स्टार्टअप चॅलेंज’ या राष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील वैद्य हरीश पाटणकर व डॉ. प्रिया गोखले यांना प्रथम पारितोषिक मिळाले. आयुष विभागातील नवीन संशोधनांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या ‘ग्लोबल आयुष इन्व्हेस्टमेंट अँड इनोव्हेशन समिट २०२२’ या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.
वैद्य पाटणकर यांनी डॉ. प्रिया गोखले यांच्यासह जेएसपीएमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या समन्वयाने ‘पंचकर्मातील स्वेदन पेटीमधील तापमान नियंत्रक’ या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या संशोधनामुळे आयुर्वेदातील पंचकर्म या चिकित्सेत स्वेदन या कर्मासाठी शास्त्रीय पद्धतीने तापमान नियंत्रण करता येणार आहे. या अनोख्या संकल्पनेचा वापर सर्व आयुर्वेद चिकित्सक, महाविद्यालये व रुग्णालये यांना होणार आहे. या संशोधनात ‘जेएसपीएम’चे प्राचार्य डॉ. राजेंद्र कानपडे, संशोधन टीममधील डॉ. अनुजा गोखले, हलीमा शेख, ज्योती सातपुते, डॉ. शैलेश हंबर्डे आदींचे सहकार्य लाभले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..