तापमान पट्टी
Sakal

तापमान पट्टी

कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले.
Summary

कोरोनाकाळात रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले.

पुणे - कोरोनाकाळात रुग्णांकडून (Patients) अव्वाच्या सव्वा बिल (Bill) घेण्याचा प्रयत्न झाला. पण महापालिकेने प्रत्येक रुग्णालयात (Hospital) बिल तपासून त्यातून जागेवरच तब्बल सहा कोटी रुपये कमी केले. तर उपचारानंतर घरी सोडल्यावर अनेकांनी महापालिकेकडे बिलांबाबत तक्रार केली, त्यातून एक कोटी १४ हजार रुपयांचे बिल कमी केले. दोन वर्षानंतर कोरोनाची साथ कमी झालेली असताना याच कालावधीत महापालिकेने पुणेकरांचे सात कोटी रुपयांची बचत (Saving) केली.

कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च २०२० मध्ये पुण्यात सापडला, त्यानंतर कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत गेला. रुग्णांच्या विलगीकरणासाठी महापालिकेने शहरात अनेक ठिकाणी कक्ष सुरू केले; तसेच महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारांची सुविधा उपलब्ध केली. शिवाजीनगर व बाणेर येथे जम्बो कोविड रुग्णालय उभे केले. खासगी रुग्णालयांतही उपचार घेणाऱ्यांची संख्या मोठी होती.

कोरोना रुग्णांवर उपचार करताना संसर्ग होऊ नये यासाठी सावधगिरी बाळगावी लागत होती. हे कारण पुढे करून खासगी रुग्णालयांनी अव्वाच्या सव्वा बिल घेण्यास सुरवात केली. याविरोधात तक्रारी आल्यानंतर रुग्णालयांनी बिल नियमानुसार घेतले आहे की नाही?, याची तपासणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आॅडिटरची नियुक्ती केली. उपचारानंतर रुग्णाला घरी सोडण्यापूर्वी बिलाची तपासणी केली जात होती. त्यामध्ये जास्त बिल घेतल्याचे लक्षात येताच, लगेच तेथे बिल कमी करून दिले जात असल्याने रुग्णासह नातेवाइकांना आर्थिक दिलासा मिळत होता. अशाप्रकारे सुमारे एक हजार नागरिकांचे सहा कोटी रुपये वाचविण्यात आले.

डिस्चार्जनंतर कमी केलेले बिल

  • १४२ - आलेल्या तक्रारी

  • ५,९५,८६,४७१ - रुग्णालयांनी आकारलेले बिल

  • ४,९५,७१,७३० - तपासणीनंतर झालेले बिल

  • १,००,१४,७४१ - कमी केलेली रक्कम

तक्रारींनंतर रुग्णालयाशी संपर्क

उपचारानंतर अनेक रुग्णांनी आमच्याकडून जास्त बिल घेतले, बिलात लावलेल्या वस्तू व उपचार केलेलेच नाही, असा दावा नातेवाइकांकडून केला जात होता. त्यामुळे अशाही तक्रारी पालिकेने स्वीकारण्यास सुरुवात केली. यामध्येही नागरिकांकडून जास्त पैसे घेतल्याचे समोर आले. पालिकेने तपासणी केलेल्या बिलापैकी १४२ रुग्णांकडून एक कोटी १४ लाख ७४१ रुपये जास्त घेतल्याचे कळाले. त्यानुसार पालिकेने रुग्णालयास पैसे परत करण्यास भाग पाडले.

कोरोना रुग्णांकडून उपचारादरम्यान जास्त बिल घेतले जात असल्याने २८ मार्च २०२० पासून प्रत्येक रुग्णालयात आॅडिटरद्वारे बिलांची तपासणी केली. रुग्णास डिस्चार्ज देतानाच बिल तपासून सुमारे एक हजार जणांचे सहा कोटी रुपयांचे बिल कमी केले, तर उपचारानंतर घरी गेल्यावर अनेकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यामध्ये १४२ जणांचे एक कोटी १४ हजार रुपये कमी केले. महापालिकेने यामधून सात कोटींपेक्षा जास्त रक्कम कमी करून दिली आहे.

- डॉ. मनीषा नाईक, सहायक आरोग्य प्रमुख , पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com