सुरक्षा ठेवीची बिले नियमानुसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुरक्षा ठेवीची बिले नियमानुसार
सुरक्षा ठेवीची बिले नियमानुसार

सुरक्षा ठेवीची बिले नियमानुसार

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : महावितरणच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल हे महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या आदेशाप्रमाणे व नियमानुसारच आहे. तसेच, जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर वीजग्राहकांना दरवर्षी मिळणारी व्याजाची रक्कम वीजबिलामध्ये समायोजित केली जाते, असे महावितरणकडून सांगण्यात आले. आयोगाकडून बहुवार्षिक वीजदराच्या निश्चितीकरणानुसार १ एप्रिल २०२२ पासून नवीन वीजदर लागू केले आहे. यामध्ये बहुतांश वर्गवारीचे दर २०२१-२२ मध्ये लागू असलेल्या वीजदराच्या पातळीवरच ठेवले आहेत. त्यामुळे सरसकट वीज दरवाढ झालेली नाही, असे महवितरणचे म्हणणे आहे.

महावितरणकडून सध्या नागरिकांना वीजबिलाबरोबरच अतिरिक्त सुरक्षा ठेवीची बिले पाठविली जात आहे. पूर्वी एक महिन्याचे ठेवीची बिले पाठविण्यात येत होती. आता ती दोन महिन्यांची अतिरिक्त ठेव घेण्यात येत असल्यामुळे नागरिकांकडून त्याला विरोध होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महावितरणकडून त्यामागील स्पष्टीकरण दिले आहे. महावितरणकडून बहुवर्षीय वीजदर विनिमय २०१९ नुसार वीजदर ठरवून मिळावेत, यासाठी महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावासंबंधी आयोगाने ३० मार्च २०२० रोजी आर्थिक वर्ष २०२०-२१ ते आर्थिक वर्ष २०२४-२५ पर्यंतच्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी वीजदराचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार महावितरणच्या विविध ग्राहक वर्गवारीसाठी १ एप्रिल २०२० पासून लागू असणारे वीजदर निश्चित केले आहे.


सहकार्य करण्याचे आवाहन
सध्या १ एप्रिलपासून लागू असलेल्या वीजदरानुसार महावितरणकडून वीजबिलांची आकारणी करण्यात येत आहे. यातील बहुतांश वर्गवारीतील वीजदर मागील वर्षीच्या दराच्या पातळीवर ठेवून ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, सद्यःस्थितीत वीजग्राहकांना नियमित वीजबिलांसह अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. सुरक्षा ठेवीचे बिल हे नियमानुसारच आहे. विद्युत नियामक आयोगाने २५ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी केलेल्या आदेशातील निमय क्र.१३ नुसार ग्राहकांची सुरक्षा ठेव सरासरी देयकाच्या दुप्पट, तसेच त्रैमासिक बिलिंग असलेल्या ग्राहकांची सुरक्षा ठेव दीडपट करण्याची करण्याची तरतूद केली आहे. या तरतुदीनुसार महावितरणकडून वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीमधील रकमेच्या फरकाची स्वतंत्र बिले देण्यात येत आहे. तसेच, जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवर दरवर्षी स्वतंत्र परिपत्रक काढून व्याज देण्यात येत असते. त्यामुळे सुरक्षा ठेवीची बिले भरून सहकार्य करावे, असे आवाहनही महावितरणने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top