कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी पुण्यातूनही रसद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी पुण्यातूनही रसद
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी पुण्यातूनही रसद

कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीसाठी पुण्यातूनही रसद

sakal_logo
By

उत्तरमध्ये प्रचारासाठी
भाजपला पुण्यातून रसद
कोल्हापूर कनेक्शन असणाऱ्यांवर जबाबदारी
पुणे, ता. ७ ः उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून त्यासाठी पुण्यातूनही कार्यकर्त्यांची रसद पुरविण्यात येत आहे. माजी महापौर, दोन आमदारांसह नगरसेवक आणि काही पदाधिकारीही कोल्हापूरला रवाना झाले आहेत.
पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जयश्री जाधव तर भाजपकडून सत्यजित कदम यांच्यात थेट लढत होत आहे. त्यासाठी १२ एप्रिलला मतदान होणार असून १६ एप्रिलला मतमोजणी होईल. जिल्ह्यात भाजपचा एक तरी आमदार असावा, यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या जोरदार प्रयत्न करीत आहेत.
निवडणुकीसाठी पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये ज्यांचे कोल्हापूर ‘कनेक्शन’ आहे त्यांना प्रचारासाठी बोलविले आहे. पुण्यातून दोन आमदार, माजी महापौरांसह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर असा प्रवास करीत आहेत. काहीजण मुक्कामी आहेत.
पक्षाचे पुण्यातील महापालिका निवडणूक प्रमुख राजेश पांडे म्हणाले, ‘‘कोल्हापूरमधील ७७ शक्ती केंद्रांसाठी सहायक म्हणून, हजार यादीवर देखरेख करण्यासाठी आणि ‘हाऊस टू हाऊस’ प्रचार आणि निवडणूक व्यवस्थापनात पुण्यातून गेलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. पुढच्या टप्प्यात आणखी पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे जाणार आहेत.’’

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..