पुरवणी परीक्षेच्या अर्जाची अठरा एप्रिलपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरवणी परीक्षेच्या अर्जाची अठरा एप्रिलपर्यंत मुदत
पुरवणी परीक्षेच्या अर्जाची अठरा एप्रिलपर्यंत मुदत

पुरवणी परीक्षेच्या अर्जाची अठरा एप्रिलपर्यंत मुदत

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : काही कारणास्तव ऑक्टोबर-नोव्हेबर २०२१च्या सत्रातील परीक्षा अर्ज भरायचे राहिले असतील, तर पुन्हा एक संधी महाविद्यालयांना आणि विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने अर्ज भरण्यासाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत दिली आहे.
महाविद्यालयांकडून अर्ज इनवर्ड करायचे राहिले असेल, तसेच काही विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज भरला नसेल तर त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. डॉ. काकडे म्हणतात, या कालावधीत परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा घेण्यात येईल. महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांची मौखिक, प्रात्यक्षिक आदी परीक्षा घेऊन संबंधित माहिती संगणकीय पद्धतीने भरण्यात यावी. महाविद्यालयांनी विनाविलंब १९ ते २० एप्रिल दरम्यान अर्ज इनवर्ड करण्याच्या सूचनाही विद्यापीठाने दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..