कर्ज फेडण्यासाठी अनोळखी व्यक्तींकडून अश्लील छायाचित्रे पाठवून शिवीगाळ

कर्ज फेडण्यासाठी अनोळखी व्यक्तींकडून अश्लील छायाचित्रे पाठवून शिवीगाळ

पुणे, ता. १० : ऑनलाइन कर्ज घेतले नसतानाही एका व्यक्तीला संबंधित कर्ज फेडण्यासाठी अनोळखी व्यक्तींकडून तगादा लावण्यात आला. संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनाही अश्लील छायाचित्रे पाठवून त्यांनाही शिवीगाळ केल्याची घटना घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी ४० वर्षीय व्यक्तीने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी मोबाईलधारक व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यासह खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार ३१ ऑक्‍टोबर २०२१ पासून आतापर्यंत सुरू होता. ऑनलाइन कर्ज फेडण्यासाठी अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्यांना मारहाण करण्याची धमकी देत दिली तसेच फिर्यादीचे कुटुंबीय व नातेवाईकांना अश्लील छायाचित्रे पाठवून त्यांनाही शिवीगाळ केली. या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने संबंधितांविरोधात पोलिसांकडे धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com