संसद भवनच्या परिषदेत सिम्बॉयसिस लॉ स्कूलचा सहभाग

पुणे, ता. १३ : लोकसभा सचिवालयाने आयोजिलेल्या कायद्याच्या विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय परिषदेला उपस्थित राहण्यासाठी सिम्बॉयसिस लॉ स्कूलच्या शिष्टमंडळाने संसद भवनास दिली. ‘ई- गव्हर्नन्सच्या युगात अधिकारांचे विभाजन’ या परिषदेत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लॉ कॉलेजच्या संचालिका डॉ. शशीकला गुरपुर यांच्यावतीने प्रा. क्षितिज नाईकडे यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. अंगिरा भट्टाचारजी, तमन्ना चचलानी, शिवांश आहुजा, वेदांश टंडन, तारेश बक्षी आणि आश्विन वरदराजन या विद्यार्थ्यांचा शिष्टमंडळात समावेश होता. परिषदेच्या उद्घाटन समारंभास लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह, परराष्ट्र व्यवहार संसदीय स्थायी समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी, सार्वजनिक तक्रारी, कायदा आणि न्याय स्थायी समितीचे अध्यक्ष एस. के. मोदी आणि लोकसभेचे मानद सरचिटणीस उत्पल कुमार सिंह उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com