Nagpur Jail
Nagpur Jailsakal

गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून सुटका

Published on

पुणे : पुणे-मुंबर्इ एक्स्प्रेस वेवर रॅली बेकायदेशीरपणे रॅली काढत शक्तीप्रदर्शन व कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानबद्धतेची कारवार्इ केलेला गुंड गजानन मारणे याची नागपूर कारागृहातून रविवारी सुटका केली. या प्रकरणात मारणे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक करून एमपीडीए कायद्यान्वये १ वर्ष स्थानबद्धतेची कारवार्इ केले होती.

दोन खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर मारणे याची १६ फेब्रुवारी २०२१ रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली होती. त्यामुळे त्याच्या जवळच्या व्यक्तींनी मारणे कारागृहातून बाहेर येताच बेकायदा जमाव जमवून फटाके वाजवले. त्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ आरडाओरडा करून दहशत निर्माण केली व त्याची रॅली काढली. या प्रकरणी मारणेसह त्याच्या साथीदारांवर पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलिसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हे दाखल केले होते.

त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक करून वडगाव मावळ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने जामीन मंजूर करताच तो अज्ञात ठिकाणी गेला होता. स्थानबद्धतेची कारवार्इ करण्यासाठी ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी एमपीडीए कायद्याखाली प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी तो मंजूर केला. मात्र, तेव्हा गजानन मारणे फरार होता. ग्रामीण पोलिसांनी त्याला जावळी तालुक्यातील मेढा येथे ७ मार्च २०२१ रोजी अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली होती. पुण्यातून त्यानंतर त्याला नागपूर कारागृहात हलविले होते. मुदत संपल्याने त्याची नागपूर कारागृहातून सुटका केल्याची माहिती ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com