''मसगा'' महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्रातर्फे व्याख्यानमाला

''मसगा'' महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्रातर्फे व्याख्यानमाला
Published on
महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात व्याख्यानमाला मालेगाव शहर : येथील महाराजा सयाजीराव गायकवाड कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रातर्फे विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला झाली.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुभाष निकम होते. नामपूर महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी पाटील आणि डॉ. युवराज भामरे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. पाटील यांनी मराठी संशोधनातील प्राचीन वाङ्मय, संत साहित्य, ऐतिहासिक दस्तऐवज, लोकसाहित्य आणि बोलीभाषा या महत्त्वाच्या संशोधन क्षेत्रांचा आढावा घेतला. डॉ. भामरे यांनी संशोधन पद्धतीतील विषय निवड, माहिती संकलन, विश्लेषण आणि प्रबंध लेखन या टप्प्यांवर मार्गदर्शन केले. डॉ. निकम यांनी समाजाच्या विकासासाठी संशोधनाचे महत्त्व असल्याचे सांगितले. मराठी विभागप्रमुख डॉ. ए. जी. नेरकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मराठी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. अरुण पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजय बच्छाव यांनी केले. डॉ. विनोद गोरवाडकर, डॉ. संतोष कन्नोर, प्रा. उज्ज्वला अहिरे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com