धानोरे शाळेत टाळमृदंगाचा गजर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धानोरे शाळेत टाळमृदंगाचा गजर
धानोरे शाळेत टाळमृदंगाचा गजर

धानोरे शाळेत टाळमृदंगाचा गजर

sakal_logo
By

आळंदी, ता. २० : पारंपारिक वारकरी, मावळ्यांचा वेशभूषा करून टाळमृदंगाचा गजर अन् छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करत धानोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जिल्हा परिषद शाळेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाळमृदंगाच्या गजरात दिंडी काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेला विद्यार्थी, सोबत मावळे अन्‌ स्वागतासाठी आकर्षक नऊवारी वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनाला उपस्थित असल्याचा जिवंत देखावा विद्यार्थ्यांनी सादर केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भजनही केले. यावेळी वडगाव घेनंद येथील शालेय शिवव्याख्याती शुभदा बवले हीचे शिवचरित्रावर आधारित व्याख्यान झाले. यावेळी प्राचार्य सत्यवान लोखंडे आणि शिक्षक पालकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.