जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी जलसंवाद –अतुल काळसेकर,

जलसंधारणाची चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी जलसंवाद –अतुल काळसेकर,
Published on: 

जलसंधारण चळवळीसाठीच
शुक्रवारी ‘जलसंवाद’ : काळसेकर

ॲग्रोवन वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात जलसंधारणाची लोकचळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘जलसंवाद’ उपक्रम हाती घेण्यात येत असल्याची माहिती सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे प्रमुख तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथे दिली. जलसंवाद कार्यक्रम बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवनात शुक्रवारी (ता. २०) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्गनगरी येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात श्री. काळसेकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर उपस्थित होते.

श्री. काळसेकर म्हणाले, ‘‘हवामान बदल आणि पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करण्यासाठी समाजातील विविध घटकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पाण्याच्या प्रश्नावर कोकणातील पाणी नियोजनाचाही स्वतंत्रपणे विचार होणे आवश्यक आहे.’’

वनराई बंधारे ही पाणी अडविण्याची तात्पुरती व्यवस्था आहे. पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भूजल पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास आणि गावाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार जलसंधारणाची कामे शास्त्रीय पद्धतीने करावी लागतील. त्यासाठी प्रत्येक गावात जलसंधारणाचे शास्त्र सर्वसामान्यांना समजणे आवश्यक आहे. यासाठी सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात आला आहे.

शुक्रवारच्या कार्यक्रमाला पालकमंत्री नीतेश राणे हे उपस्थित राहणार असून, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष माधव भंडारी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून उपस्थितांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार असून, जलसंधारणाची शास्त्रीय माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन काळसेकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.